पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी राजधानी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, एआयवर चर्चा करण्यासाठी जगाला एकत्र आणत आहे. आजपासून, भारत दिल्लीतील भारत मंडपम येथे एआय परिषदेचे आयोजन करत असून यासाठी मी जगभरातील जागतिक नेते, उद्योगातील नेते, नवोन्मेषक, धोरणकर्ते, संशोधक आणि तंत्रज्ञान उत्साही यांचे हार्दिक स्वागत करत असल्याचे म्हटले आहे.
काल 16 पासून सुरू झालेली ही परिषद 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून या शिखर परिषदेत 3,250 हून अधिक वक्ते आणि 500 हून अधिक सत्रे असतील.
20 देशांचे नेते
उपस्थित राहणार
जागतिक तंत्रज्ञान नेते सुंदर पिचाई आणि सॅम ऑल्टमन आणि ब्राझील आणि फ्रान्ससह सुमारे 20 देशांचे नेते या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. यूके, दक्षिण कोरिया आणि फ्रान्समधील शिखर परिषदेनंतर ही चौथी एआय शिखर परिषद आहे.