नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 2 पोलीस शहीद

0
10

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर काल सकाळी नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले, तर 1 पोलीस कर्मचारी जखमी झाला. शहीद झालेले दोन्ही पोलीस हे छत्तीसगड पोलीस दलातील आहेत.
छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रात काल सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसर, घटनास्थळी 10-12 जणांच्या महिला-पुरुष नक्षल्यांच्या टोळीने विनाशस्त्र चहा पिण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला केला. बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह आणि ललित यादव यांचा या गोळीबारात मृत्यू झाला.