धोकादायक खाणींती पाणी उपशास सुरुवात

0
18

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; २ ते ३ खाणी धोकादायक

राज्यातील उत्तर गोव्यातील २ ते ३ खाणी धोकादायक बनत असल्याचे आढळून आले आहे. पिसुर्ले येथील खाणींतील पाणी उपसण्यास सुरुवात करण्यात आली आहे, तर डिचोली तालुक्यातील खाणींमधील पाणी उपशास सोमवारपासून सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित उपजिल्हाधिकारी, मामलेदार, जलस्रोत खात्याचे अधिकारी आणि इतरांच्या समवेत खाणींची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. खाणींमुळे दुर्घटना घडू नये, म्हणून तातडीने उपाययोजना हाती घेण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.