धारबांदोड्यात फाशात अडकून बिबट्याचा मृत्यू

0
4

धारबांदोडा येथे फाशात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार काल उघडकीस आला. वन विभागाने या प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन तपासकामाला सुरुवात केली. खासगी जागेत लावण्यात आलेल्या फाशात बिबटा अडकला होता. फाशात अडकून जखमी झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.