दोन्ही पालिकांसाठी एकूण 11 उमेदवारी अर्ज दाखल

0
9

फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी काल 6 उमेदवारी अर्ज, तर साखळी पालिका निवडणुकीसाठी 5 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
फोंडा आणि साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या तीन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येऊ लागल्याने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी काल एकूण 6 अर्ज दाखल करण्यात आले. प्रभाग 1, 2, 3 आणि 12 मधून प्रत्येकी 1 उमेदवारी अर्ज, प्रभाग 4 मधून 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. फोंडा नगरपालिकेचे एकूण 15 प्रभाग आहेत.
साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी 5 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. प्रभाग 6, प्रभाग 8, प्रभाग 9 मधून प्रत्येकी 1 अर्ज आणि प्रभाग 10 मधून 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या नगरपालिकेचे एकूण 12 प्रभाग आहेत.