दोघा भावांकडून अमेरिकन महिलेची लाखोंची फसवणूक

0
18

गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने एका अमेरिकन महिलेची सुमारे 48.77 लाखांची फसवणूक प्रकरणी कुंकळ्ळी येथील रोहन फळदेसाई व साईराज फळदेसाई बंधूच्या विरोधात काल गुन्हा दाखल केला. सदर दोन्ही भावांनी अमेरिकन महिलेशी मैत्री केल्यानंतर तिच्याशी कॉम्प्युटरच्या वस्तू विक्रीचा जोड व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवले. या प्रकरणी सध्या पर्वरीत वास्तव्यास असलेल्या पा मुसा शिआँग या अमेरिकन महिलेने सायबर विभागात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिलेने 23 नोव्हेंबर 2021 ते 18 जून 2022 दरम्यान दोघांना 48 लाख 77 हजार 021 रुपये क्रिप्टोपरन्सी दिली होती.