दूधसागर नदीत तरुण बुडाला

0
15

>> ओकांब येथील घटना; शोधकार्य सुरू

मूळ उत्तर प्रदेश येथील पण, सध्या तिस्क-उसगाव येथे राहणारा सिद्धू मितेश मिश्रा (वय २४) काल दुपारी दूधसागर नदीत बुडाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता; मात्र तो सापडू शकला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू मिश्रा आणि अन्य पाच युवक रविवारी सुटीचा दिवस असल्याने मौजमजा करण्यासाठी संजीवनी साखर कारखान्यामागील दूधसागर नदीवर गेले होते.

ओकांब येथे नदीत उतरल्यानंतर सिद्धू मिश्रा गटांगळ्या खाऊ लागला आणि पाण्यात दिसेनासा झाला. त्याला वाचवण्याचे इतरांनी प्रयत्न केले; पण काहीच उपयोग झाला नाही. ही घटना डोळ्यासमोर घडल्याने अन्य युवकांची घाबरगुंडी उडाली. त्याच्या सहकार्‍यांनी व इतर नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस व अग्निशामक दलाला दिली. त्यांनी सिद्धूचा शोध घेतला; पण तो रात्रीपर्यंत सापडू शकला नाही.