लेहमधील कारु येथे त्रिशुळ युद्धसंग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल रविवारी झाले. सुमारे 3 कोटी रुपये खर्च करुन हे संग्रहालय उभारण्यात येत आहे. या संग्रहालयासाठीचा निधी महाराष्ट्र सरकारने दिला आहे. या संग्रहालयासाठी आणखी निधी लागला तर तो दिला जाईल असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला तेव्हा एनएसजी तुकडीचे नेतृत्व करणारे कर्नल सुनील शेओरान 14 कोर कमांडर लेफ्टनंट जनरल रशीम बाली, मेजर जनरल पी. के. मिश्रा आणि आ. श्रीकांत भारतीय यावेळी उपस्थित होते.