‘त्या’ हेल्मेट, घड्याळाचे वीजमंत्र्यांसमोर प्रात्यक्षिक

0
8

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि दोन विद्यार्थ्यांनी वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तयार केलेले सुरक्षा हेल्मेट आणि सुरक्षा घड्याळाचे प्रात्यक्षिक वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासमोर पर्वरी येथे मंत्रालयात काल सादर केले. वीज खात्यातील कर्मचाऱ्याच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. जीईसीचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुरक्षा उपकरणांची ढवळीकर यांनी प्रशंसा केली.