‘त्या’ विमान प्रवाशांनी संपर्कासाठी आवाहन

0
154

कोरोनाची लागण व्यक्तीच्या सोबत विमान प्रवास केलेल्या गोव्यातील व्यक्तींनी १०४ हेल्पलाईन किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे. न्यूयॉर्क ते मुंबई आणि २२ मार्च रोजी विस्ताराच्या यूके ८६१ विमानाने मुंबई ते गोवा असा प्रवास केलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे. या व्यक्तीच्या सोबत प्रवास केलेले अनेक व्यक्ती गोव्यात आहेत. त्या व्यक्तींनी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आरोग्य विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.