‘ती’ युवती आता भीतीच्या छायेखाली

0
6

सिरीयल किलर महानंद नाईक याला 21 दिवसांच्या फर्लोवर बाहेर सोडण्यात आल्याने त्याच्या तावडीतून वाचलेली एक युवती भीतीच्या छायेखाली आली असून, तिने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, नाईक याने तुरुंगात असताना वाचलेल्या सदर युवतीला एकदा फोनवरून तुरुंगातून बाहेर आल्यावर तुला बघून घेईन, अशी धमकी दिली होती. सदर युवतीने याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर त्या युवतीला मोबाईल फोन क्रमांक बदलण्याची सूचना केली होती; मात्र नाईक हा शांत डोक्याने काम करणारा असून, त्या युवतीचा बदललेला संपर्क क्रमांकही मिळवू शकतो, असे तारा केरकर यांचे म्हणणे आहे.