ताळगाव नियोजन क्षेत्राच्या हरकतींसाठी आणखी मुदत

0
6

उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने (एनजीपीडीए) ताळगाव नियोजन क्षेत्राचा जमीन वापर नकाशा आणि नोंदवही संदर्भात हरकती स्वीकारण्याची मुदत वाढविली असून, येत्या 27 मेपर्यंत हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.
एनजीपीडीएने 28 मार्च 2023 रोजी एक नोटीस जारी करून ताळगाव नियोजन क्षेत्राचा सध्याचा जमीन वापर नकाशा आणि नोंदवही तयार करण्याबाबत नागरिकांना माहिती दिली होती. नोटिसीनुसार आक्षेप सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. सदर मुदत 27 एप्रिल 2023 रोजी संपली आहे. ती मुदत आणखी 30 दिवसांनी वाढवून 27 मे 2023 पर्यंत करण्यात आली आहे.

नागरिकांनी कोणत्याही आक्षेपांबाबत उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना लेखी माहिती द्यावी. आक्षेप या प्राधिकरणाच्या कार्यालयात सादर केले जाऊ शकतात. जमिनीचा वापर नकाशा आणि नोंदवही प्राधिकरणाच्या कार्यालयात तसेच स्थानिक पंचायतींमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहे, असे कळविण्यात आले आहे.