तब्बल 70 वर्षांनंतर जी-20 ची जम्मू-काश्मीरमध्ये होणार बैठक

0
11

>> श्रीनगरमध्ये 22 व 23 मे रोजी आयोजन

जम्मू काश्मीरमध्ये जी-20 परिषदेची बैठक घेण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यानुसार श्रीनगरमध्ये 22 आणि 23 मे रोजी पर्यटनासंबंधित कार्य गटाची बैठक होणार आहे.

जवळपास 70 वर्षांनंतर पहिल्यांदाच जी-20 ची बैठक जम्मू-काश्मीरमध्ये होणार आहे. कलम 370 हटवल्यानंतर ही पहिलीच आंतरराष्ट्रीय शिखर परिषद जम्मू-काश्मीरमध्ये होणार आहे. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाने काश्मीर विद्यापीठासोबत एक सामंजस्य करार केला आहे, ज्या अंतर्गत विद्यापीठ युथ-20 शिखर परिषदेपूर्वी कार्यक्रमांचे आयोजनदेखील करेल.

चीन-पाकिस्तानाचा विरोध
जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 बैठक घेण्यास चीन आणि पाकिस्तानचा विरोध आहे. जी-20 मध्ये सहभागी देशांना मदत करून पाकिस्तान या बैठकीला विरोध करत होता. जी-20 बैठक जम्मू-काश्मीरमध्ये होऊ नये, असे चीनने मार्चमध्येच म्हटले होते. आता ही बैठक श्रीनगरमध्ये पार पडल्यानंतर चीन त्यापासून दूर राहू शकतो, असे मानले जात आहे.