भारतीय तटरक्षक दलाच्या ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर ध्रुव मार्क 3 चे आपत्कालीन लँडिंग केरळमधील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ करण्यात आले. ज्यावेळी हेलिकॉप्टर उतरवण्यात आले त्यावेळी ते 25 फूट उंचीवर उडत होते. या घटनेमुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, एका प्रशिक्षणार्थीचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तटरक्षक दलांव्यतिरिक्त, लष्कर, नौदल आणि वायुसेनेद्वारे याचा वापर केला जातो. या महिन्यात हेलिकॉप्टर अपघाताची ही दुसरी घटना आहे. 8 मार्च रोजी भारतीय नौदलाच्या नियमित उड्डाण करणाऱ्या मुंबईतील अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. नौदलाचे हेलिकॉप्टर गस्तीसाठी निघाले असताना 8 मार्चला सकाळी ही घटना घडली.