ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चीट

0
13

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोपांच्या भोवर्‍यात सापडलेला आर्यन खान याला एनसीबीकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. एनसीबीकडून शुक्रवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. एकूण सहा हजार पानांच्या आरोपपत्रात आर्यन खानवर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे एनसीबीकडून आर्यनला क्लीन चीट मिळाली आहे.

आर्यन खानला कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नव्हते, असे एनसीबीने म्हटले आहे. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, चौकशीत ६ आरोपींविरोधात पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे आर्यनसह ६ जणांची नावे आरोपपत्रातून वगळली आहेत. आरोपपत्रांतून नावे वगळलेल्यांमध्ये आर्यन खान, अविन शुक्ला, गोपाल आनंद, समीर साईघन, भास्कर अरोरा व मानव सिंघल यांचा समावेश आहे.