डिचोलीत आज खाणीबाबत जनसुनावणी

0
4

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे डिचोलीत शुक्रवार दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता खाणीसंदर्भात जनसुनावणी होणार असून, त्यासाठीची सर्व ती जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, मामलेदार यांनी काल दिवसभरात भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.
डिचोली खाणपट्टा क्रमांक 1 ज्याचे क्षेत्र 478.5206 हेक्टर एवढे आहे. त्या खाणपट्ट्यासाठी ही जनसुनावणी होणार आहे. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजल्यापासून नोंदणी होणार असून, 10.30 वाजता प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. पर्यावरण, शेतकरी, गावकऱ्यांचे प्रश्न, प्रदूषण, कामगार वर्गाचे प्रश्न, जलसाठे आदी अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत.