ट्रकच्या धडकेत विद्यार्थी गंभीर जखमी

0
22

झुआरीनगर येथील एमईएस जंक्शनजवळ भरधाव ट्रकने 14 वर्षीय विद्यार्थी ॲग्नेलो परेरा याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार झुआरीनगरमधील झोरिंत येथील ॲग्नेलो परेरा सायकलवरून शिकवणीवरून घरी जात असताना भरधाव ट्रकने त्याला धडक दिली, त्यात तो गंभीर जखमी झाला. ट्रकने सिग्नल तोडून विद्यार्थ्याच्या अंगावर धडक दिल्याचा आरोप होत आहे. जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. वेर्णा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. वेर्णा पोलीस पुढील तपास करीत आहेत.