‘ज्ञानप्रसारक’ फुटबॉल स्पर्धा उत्साहात

0
138

म्हापसा येथील ज्ञानप्रसारक विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने गोवा फुटबॉल संघटनेच्या सहकार्याने आयोजित रायझिंग स्टार्स आंतरशालेय आणि आंतरवर्ग फुटबॉल स्पर्धेचा चौथा मोसम धुळेर फुटबॉल मैदानावर झाला.

या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा फुटबॉल असोसिएशनचे कार्यकारी सदस्य ग्रेगरी डिसोझा, ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण पोकळे. ज्ञानप्रसारक विद्यालयाचे व्यवस्थापक दामोदर नाटेकर, पालक शिक्षक संघाचे सल्लागार हरीश मेलवानी, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रशांत नार्वेकर, शाळेचे मुख्याध्यापक गुरूदास पालकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या दरम्यान झालेल्या आंतरवर्ग सामन्यात टायगर्स संघाने शूटआऊटमध्ये ३-२ च्या फरकाने फँटम संघाला पराभूत केले. पहिल्या आंतरशालेय स्पर्धेत ज्ञानप्रसारक विद्यालयाच्या रायझिंग स्टार्सच्या मुलींनी पर्वरीच्या डोना लिओनार मेमोरियल हायस्कूलच्या मुलींच्या संघाला १-० अशा फरकाने पराभूत केले.
दुसर्‍या आंतरशालेय स्पर्धेत चब्बी चिक्स प्राथमिक शाळेतील मुलांच्या संघाने ज्ञानप्रसारक विद्यालयाच्या रायझिंग स्टार्सच्या मुलांच्या संघाला ३-१ असे हरविले.