जी 20 शिखर परिषदेच्या तिसऱ्या विकास कार्य गटाची बैठक येत्या 9 ते 11 मे 2023 दरम्यान गोव्यात होणार आहे. गोव्यात होणारी जी 20 शिखर परिषदेची ही दुसरी बैठक आहे. या बैठकीला जी 20 देशातील नेते आणि तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत तंत्रज्ञान ते महिला सशक्तीकरण आदी विषयावर चर्चा केली जाणार आहे.