जी. पेरारिवलनच्या सुटकेचे आदेश

0
13

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी जी. पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी पेरारिवलन याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

पेरारिवलन ३० वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत स्पष्टपणे म्हटले होते की, सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, तर आम्ही त्याची सुटका करू. त्यानुसार काल न्यायालयाने पेरारिवलनच्या सुटकेचे आदेश दिले. या निर्णयामुळे या प्रकरणातील अन्य आरोपी निलिनी श्रीहरन, मरुगन आणि श्रीलंकन नागरिकांसह अन्य ६ आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.