‘जय जय महाराष्ट्र माझा’ महाराष्ट्राचे राज्यगीत घोषित

0
14

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या अधिकृत राज्यगीतासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 19 फेब्रुवारीपासून अंगीकारण्यात येणार आहे. या राज्यगीतासाठी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील तयार करण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाने या संदर्भातील घेतलेल्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली.