जम्मू-काश्मीरात जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0
128

 

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममधील लोअर मुंडा परिसरात जवानांकडून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या परिसरात अजूनही चकमक सुरू आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. एवढेच नाहीतर चकमक झालेल्या ठिकाणाहून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठाही जवानांनी जप्त केला आहे. या कारवाईत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे दहशतवादी द रेजिस्टेंस फ्रंटचे आहेत.

दरम्यान, काश्मीरमधील १४ लॉंच पॅडसवर मोठ्या  संख्येने दहशतवादी थांबले आहेत. हे सर्व दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.