जम्मू-काश्मीरमध्ये सीमेजवळ दहशतवाद्याचा खात्मा

0
19

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दुसऱ्या दिवशीही दहशतवादविरोधी कारवाई सुरूच असून सीमेजवळ एका दहशतवाद्याला ठाक करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी रविवारी कुपवाडा पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी सीमेजवळ एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. सीमेवर दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि कुपवाडा पोलिसांनी नियंत्रण रेषेजवळील तंगधारच्या अमरोही भागात संयुक्तपणे कारवाई सुरू केली. या संयुक्त कारवाई दरम्यान एक दहशतवादी मारला गेला आणि घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.