छळाचा आरोप करत 6 कैद्यांची कोर्टात धाव

0
3

कोलवाळ-म्हापसा येथील राज्य मध्यवर्ती कारागृहातील सहा कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांवर दादागिरीचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे. या याचिकेवर बुधवार दि. 21 जून रोजी सुनावणी होणार आहे. मध्यवर्ती कारागृहातील कैदी समीर शेख व 5 इतरांनी एक याचिका दाखल केली आहे. मध्यवर्ती कारागृहात कैदी टारझन पार्सेकर आणि विजय कारबोटकर यांच्यात झालेल्या मारामारीनंतर कारागृहातील अधिकाऱ्यांनी दादागिरी आणि गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आहे, असा दावा या कैद्यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून, याचिकाकर्त्या कैद्यांना त्यांच्या वकिलांना भेटण्याची परवानगी देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. गेल्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टारझन पार्सेकर आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले विजय कारबोटकर यांच्या दोन गटात कारागृहाच्या आवारातच भांडण झाले होते.