चोवीस तासांत राज्या कोरोनाचे १३ नवे रुग्ण

0
10

राज्यात चोवीस तासांत नवीन १३ कोरोना बाधित आढळून आले असून सक्रिय रुग्ण संख्या ८४ झाली आहे. राज्यात मागील दोन दिवस एकेरी संख्येने नवीन कोरोना रुग्ण आढळून आले होते. आता पुन्हा एकदा नवीन कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात ५७७ स्वॅबचे नमुने तपासण्यात आले आहेत. मात्र राज्यात आणखी कोरोना बळींची नोंद नाही. चोवीस तासांत आणखी १० जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४१ टक्के एवढे आहे.