चोवीस तासांत राज्यात १११ कोरोनाचे रुग्ण

0
38

राज्यात चोवीस तासात नवीन १११ बाधित आढळून आले असून १ कोरोना बाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या ६१० एवढी झाली आहे. राज्यात चोवीस तासांत ८९८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. राज्यात बाधित आढळून येण्याचे प्रमाण १२.३६ टक्के आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३९६४ एवढी आहे. चोवीस तासात आणखी ४२ बाधित बरे झाले आहेत.