चोवीस तासांत राज्यात कोरोनाचे ३७ नवे रुग्ण

0
10

राज्यात कित्येक महिन्यानंतर एका दिवसाला पन्नासपेक्षा कमी कोरोनाबाधित आढळून आले असून चोवीस तासांत नवीन ३७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या ४४२ एवढी झाली आहे. चोवीस तासांत ६३१ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ५.८६ टक्के एवढे आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३९६५ एवढी आहे. चोवीस तासांत आणखीन ७४ बाधित बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२९ टक्के एवढे आहे.