Home Featured चिंबलच्या आंदोलनकर्त्यांचेकाँग्रेस पक्षातर्फे अभिनंदन

चिंबलच्या आंदोलनकर्त्यांचेकाँग्रेस पक्षातर्फे अभिनंदन

0

काल पर्वरी येथे विधानसभा संकुलात झालेल्या काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत ‘युनिटी मॉल’ व ‘प्रशासन स्तंभ’ या सरकारी प्रकल्पांविरूद्ध लढा देऊन तो जिंकलेल्या आंदोलनकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले. काल झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत येत्या गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबरोबरच अन्य विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना विरोध पक्षनेते युरी आलेमाव यांनी, स्थानिक लोकांना नको असताना त्यांच्यावर लादण्यात आला तर तो रद्द करण्यास सरकारला भाग पाडले जाऊ शकते हे चिंबलवासीयांनी दाखवून दिले आहे. त्यासाठी ते अभिनंदनास पात्र असल्याचे सांगितले. त्यांचे यश व त्यांच्या धाडसासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन केल्याचे आलेमाव यांनी विधीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. काँग्रेस आमदार या लोकांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार असल्याचे ते म्हणाले.

आवाज तुमचो सांगात आमचो
काँग्रेस आता ‘आवाज तुमचो सांगात आमचो’ असा कार्यक्रम आयोजित करणार असून त्याखाली गोवाभरातील लोकांचे प्रश्न व समस्या जाणून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकांचे हे प्रश्न नंतर विधानसभेत उपस्थित केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्ष सदैव जनतेबरोबर राहिलेला आहे आणि यापुढे त्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी सांगितले. विधिमंडळ बैठकीत फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबतही चर्चा करण्यात आली.