चांद्रयान-3 सुस्थितीत; यंत्रणा कार्यान्वित

0
8

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बुधवारी उतरलेने चांद्रयान-3 सुस्थितीत असून, त्याचे कार्य आणि यंत्रणा सामान्यपणे सुरू आहे, अशी माहिती काल इस्रोने दिली. चांद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरकडून चंद्राच्या पृष्ठभागावर हळूहळू मार्गक्रमण सुरू आहे. तसेच विक्रम लँडरमधील आयएलएसए, रम्भा आणि इतर यंत्रणा काल सुरू झाली. त्यांचेही कार्य कोणत्याही अडथळ्यांशिवाय सुरू आहे.