चांद्रयान-3चा रोव्हर 8 मीटर चालला

0
5

>> कार्य सामान्यपणे सुरू; इस्रोकडून रोव्हरचा खास व्हिडिओ शेअर

भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आणि नवा इतिहास रचला गेला. चांद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरची नियोजनानुसार हालचाल सुरू असून, आतापर्यंत प्रज्ञान रोव्हरने 8 मीटरचे अंतर यशस्वीरित्या पार केले आहे. तसेच रोव्हरवरील पेलोड्स एलआयबीएस आणि एपीएक्सएस यांचे कार्य चालू झाले आहे. याशिवाय प्रपोल्शन मॉड्युल आणि लँडर मॉड्युलवरील पेलोड्स आणि रोव्हरचे कार्य सामान्यपणे सुरू आहे, अशी माहिती काल इस्रोने दिली.

इस्रोने शुक्रवारी सहा चाके आणि 26 किलो वजन असलेल्या रोव्हरचा एक खास व्हिडिओ शेअर केला. त्यात लँडरमधून रोव्हर चंद्रावर उतरत असल्याचे दिसत आहे. इस्रोने व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘चांद्रयान-3 चा रोव्हर लँडरवरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला. टू-सेगमेंट रॅम्पमुळे रोव्हरचे उतरणे सुलभरित्या झाले. तसेच सोलर पॅनलने ऊर्जा निर्माण केल्यामुळे रोव्हरचे काम सुलभ झाले.