ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आजपासून अर्ज स्वीकारणार

0
16

राज्यातील १८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार १८ जुलैपासून प्रारंभ होत असून २५ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

वर्ष २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यातील १८६ ग्रामपंचायतीमध्ये १५२८ प्रभाग होते. तर, २०२२ च्या निवडणुकीत १५२२ प्रभाग आहेत. पाच वर्षांच्या काळात सहा प्रभागांची वाढ झाली आहे. केपे तालुक्यातील बार्शे आणि शेल्डे ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी २ प्रभाग वाढविण्यात आले आहेत. सासष्टीमधील दवर्ली-रूमडामळमध्ये २ प्रभाग वाढविण्यात आले आहे. काणकोण तालुक्यातील श्रीस्थळमध्ये २ प्रभाग वाढविण्यात आले आहेत. तर, डिचोली तालुक्यातील सुर्ला पंचायतीमध्ये २ प्रभाग कमी करण्यात आले आहेत. उत्तर गोव्यात ९७ ग्रामपंचायतीचा समावेश असून ७८३ प्रभाग आहेत.

दक्षिण गोव्यात ८९ ग्रामपंचायतींचा समावेश असून ७४५ प्रभागांचा समावेश आहे. राज्यातील १८६ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ८ लाख २७ हजार ०९९ मतदारांचा समावेश आहे. त्यात उत्तर गोव्यात ४ लाख ५ हजार ९९३ आणि दक्षिण गोव्यात ४ लाख २१ हजार १०६ मतदारांचा समावेश आहे. पंचायत क्षेत्रातील पुरुष ४ लाख १ हजार ७२५ आणि महिला ४ लाख २५ हजार ३७२ मतदारांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५६६ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील ३० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यात उत्तर गोव्यात २१ आणि दक्षिण गोव्यात ९ मतदान केंद्रांचा समावेश आहे.