गौतम अदानींकडून ठाकरे बंधूंची भेट

0
5

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ‘मातोश्री’वरील बैठकीत उद्धव ठाकरे आणि अदानी यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. त्यानंतर अदानी यांनी राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, अदानी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती.