गोव्यात जी-20 गटाच्या जूनमध्ये तीन बैठका

0
3

राज्यात आगामी जून 2023 मध्ये जी-20 गटाच्या तीन बैठका होणार असून पर्यटनमंत्र्याच्या बैठकीनंतर गोवा घोषणा प्रसिद्ध केली जाणार आहे. तिसरी आंतरराष्ट्रीय वित्तीय आर्किटेक्चर वर्किंग ग्रुप मीटिंग येत्या 5 ते 7 जून दरम्यान होणार आहे. चौथी पर्यटन कार्यगटाची बैठक 19 आणि 20 जून रोजी होणार आहे आणि पर्यटनमंत्र्यांची 21 आणि 22 जून रोजी बैठक होणार आहे. पर्यटन कार्यगटाच्या जी-20 चर्चेतून मंत्रिस्तरीय बैठकीतील निष्कर्ष ज्याला ‘गोवा घोषणा’ म्हटले जाईल, बैठकीनंतर प्रसिद्ध केले जाणार आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक मार्ग म्हणून पर्यटनाचा एक रोडमॅप आणि कृती आराखडा आणि त्यास मान्यता देणारा मंत्रीस्तरीय संभाषण जूनमध्ये गोव्यात होणाऱ्या जी-20 पर्यटन कार्यगटाच्या शेवटच्या बैठकीनंतर प्रसिद्ध केला जाईल. तिसऱ्या जी-20 बैठकीच्या दुसऱ्या दिवशी गोवा घोषणेची रूपरेषा तयार करण्यासाठी सदस्य देशांमध्ये यशस्वी चर्चा झाली, असे केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.