गोवा फाऊंडेशनविषयीचे ‘ते’ उद्गार राणेंकडून मागे

0
4

गोवा फाऊंडेशन या बिगर सरकारी संघटनेला उद्देशून आपण गोवा विधानसभेत ‘फ्रॉड’ असे जे उद्गार काढले होते, ते आपण मागे घेत असल्याचे काल वनमंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेत सांगितले. त्यांना जे काही करायचे आहे, ते त्यांना करू द्या. आपण जनतेबरोबर आहे आणि व्याघ्र प्रकल्प प्रश्नी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.