गोवा क्षत्रिय मराठा समाजातर्फे आज पणजीत श्रावणी शनिवार

0
28

गोवा क्षत्रिय मराठा तारूकर समाजातर्फे पणजी मारुतीगड मळा येथील श्री मारूतीराय संस्थानात दुसरा श्रावणी शनिवार साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ठीक 8 वा. गणेश पूजन, श्रींच्या मूर्तीस दुग्धाभिषेक, धार्मिक विधी नंतर तीर्थप्रसाद, तद्नंतर दुपारी 12 वा. आरती व सायंकाळी ठीक 5.30 वा. श्री नवदुर्गा भजनी मंडळ, बोरी यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. तद्नंतर 8.30 वा. आरती व तीर्थप्रसाद होईल. तरी श्रींस अभिषेक करू इच्छिणाऱ्या तारूकर समाजबांधवानी सकाळी 8 वा. हजर राहणे. तरी तारूकर समाजबांधव तथा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींच्या तीर्थप्रसादाचा व भजन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.