गॅस सिलिंडर स्फोटप्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक

0
8

डांगी कॉलनी म्हापसा येथे गेल्या 22 जानेवारी रोजी घडलेल्या गॅस सिलिंडर स्फोटप्रकरणी म्हापसा पोलिसांनी काल पती-पत्नीला अटक केली. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 22 जानेवारीला पहाटे 5 च्या सुमारास ब्रीझ अपार्टमेंट्समधील हिल टॉप बार आणि रेस्टॉरंटमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन मोठी वित्तहानी झाली होती. अग्निशमन विभागाच्या अहवालावर आधारित पोलिसांनी तात्काळ कलम 336, 285, 427 आर/डब्ल्यू 34 भादंसं अंतर्गत गुन्हा नोंदवत रेस्टॉरंटचे मालक असलेल्या पती-पत्नीला अटक केली. पोलिसांनी उत्पादन शुल्क विभागाला त्यांचामद्य परवाना रद्द करण्यासाठी आणि म्हापसा पालिकेला व्यापार परवाना रद्द करण्यासाठी यापूर्वीच पत्र लिहिले आहे.