खनिज डंप उचलण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत

0
12

ज्या बोलिदारांनी गोव्यातील खाणींवर पडून असलेले लोहखनिज ई-लिलावाद्वारे खरेदी केले होते, त्या बोलिदारांना सदर खनिज खाणींवरून उचलण्यासाठी राज्या सरकारने आता 31 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. ही शेवटची मुदत असून, या मुदतीत जे बोलीदार हे खनिज उचलून नेण्यास अपयशी ठरतील, त्यांचे खनिज आणखी कोणतीही नोटीस न देता ताब्यात घेतले जाईल आणि या खनिजासाठी त्यांनी फेडलेले पैसेही त्यांना परत मिळणार नसल्याचे खाण खात्याने आपल्या एका आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.
विविध खाणींवर पडून असलेले लोहखनिज गोवा सरकारने 27 वेळा केलेल्या ई-लिलावाद्वारे विकून टाकले होते; मात्र काही बोलिदारांनी आपला माल अद्याप खाणींवरून उचलला नसल्याचे खाण खात्याला आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर खाण खात्याने 31 मार्च 2023 पर्यंत हे लोहखनिज संबंधित बोलिदारांनी उचलून न्यावे, असे स्पष्ट केले आहे.