24.8 C
Panjim
Thursday, January 21, 2021

कोरोना योद्धे व आघाडीवरील कर्मचार्‍यांना मोफत कोरोना लस

>> १६ जानेवारीपासून जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम

भारत येत्या १६ जानेवारीला कोरोनावरील लसीकरणास प्रारंभ करणार असल्याची घोषणा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी काल केली. सर्वांत आधी कोरोना योद्ध्यांना आणि त्यानंतर आरोग्य कर्मचार्‍यांना ही लस दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी अधिक प्रमाणात लशींना मान्यता दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

भारतात लसीकरणासाठी वापरल्या जाणार असलेल्या कोरोनावरील लशी स्वस्त असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. काल त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत कोरोनावरील लसीकरणाच्या संभाव्य मोहिमेबाबत चर्चा केली. ही अशा प्रकारची जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असेल असे ते म्हणाले.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे, सरकारी तसेच खासगी आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, संरक्षण दले, पोलीस व निमलष्करी दलांना आधी लस दिली जाईल असे पंतप्रधानांनी सांगितले. या सर्वांच्या लशीचा खर्च केंद्र सरकार उचलील असेही त्यांनी जाहीर केले.

गेल्या २ जानेवारीला केंद्रीय औषध व प्रमाणिकरण समितीने (सीडीएससीओ) ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोविशिल्ड लशीला तसेच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला आपत्कालीन वापरासाठी सशर्त मान्यता दिली होती. त्यामुळे आता ह्या दोन्ही लशी लसीकरणासाठी वापरता येऊ शकतात.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कूल-इझ कोल्ड चेन लि. या कंपनीची मदत घेतली असून तिच्यातर्फे कोरोना लशीची वाहतूक देशभरात करण्यात येणार आहे. काल सहा वातानुकूलित ट्रकांमधून कोविशिल्ड लशीचा पहिला हप्ता केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयासाठी रवाना करण्यात आला. प्रत्येक कंटेनरमध्ये १.२० लाख कोविशिल्ड डोस असलेल्या २८० ते ३०० पेट्या असतील.

कोविशिल्डचा प्रत्येक डोस फक्त २०० रुपयांना

ऑक्सफर्ड विद्यापीठ व ऍस्ट्राझेनेकाने उत्पादित केलेल्या ‘कोवीशिल्ड’ ह्या कोरोनावरील लशीचा प्रत्येक डोस भारतात २०० रुपयांना विकला जाणार असल्याचे काल स्पष्ट झाले. सिरम इन्स्टिट्यूटतर्फे ही माहिती देण्यात आली. कोविशिल्डचा पहिला साठा पुण्याहून काल रात्री रवाना झाला. सरकारी पातळीवर काही कागदोपत्री सोपस्कार राहिल्याने थोडा विलंब झाला, मात्र ह्या कागदोपत्री सोपस्कारांची पूर्तता करण्यात आली असल्याचे सिरम इन्स्टिट्यूटतर्फे सांगण्यात आले.
पहिल्या टप्प्यात कोविशिल्डचे १० दशलक्ष डोस केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाला पाठवण्यात येत असून येणार्‍या काळात ही संख्या वाढेल.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

ध्यासपंथी

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती…वाळवंटातुनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती --बा. भ. बोरकर जीवनभर एखादा ध्यास घेऊन वावरणार्‍या व्यक्ती...

ऐतिहासिक मालिका विजय

कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक नीचांकी धावसंख्या ते ऐतिहासिक मालिका विजय असे परस्परविरोधी क्षण टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अनुभवायला मिळाले. राखेतून फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे...

तीन-चार दिवसांत मिळेल डिस्चार्ज

>> श्रीपाद नाईक यांनी दिली माहिती देवाची कृपा आणि सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. येत्या चार-पाच दिवसात...

केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन ः मुख्यमंत्री

केंद्र सरकारची राज्यातील सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल...

स्वातंत्र्यसैनिक व ‘मार्ग’चे प्रणेते गुरुनाथ केळेकर यांचे निधन

ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, कोकणी चळवळीतील एक नेते व ‘मार्ग’ ह्या रस्ता सुरक्षाविषयक चळवळीचे संस्थापक श्री. गुरुनाथ केळेकर (९१) यांचे काल पहाटे ३.३०...

ALSO IN THIS SECTION