कोरोनाबाधितांना पालिका मतदानाची संधी

0
7

फोंडा आणि साखळी या दोन्ही नगरपालिकांच्या येत्या 5 मे 2023 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी कोरोनाबाधित नागरिकांना मतदान करण्याची संधी दिली जाणार आहे. कोरोनाबाधित नागरिकांना मतदानासाठी संध्याकाळी 4 ते 5 असा एक तास दिला जाणार आहे.
या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीतील मतदानासाठी तयारी सुरू आहे. निवडणुकीसाठी मतदान सकाळी 8 ते संध्याकाळी 5 यावेळेत घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी निवडणुकीत सहभागी करून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत.
नगरपालिका निवडणुकीतील मतदान करणाऱ्या मतदारांना मतदानाच्या वेळी ओळख पटविण्यासाठी ओळखपत्रासाठी म्हणून आठ पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यात निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र, छायाचित्र असलेले सरकार किंवा सरकारी महामंडळाने जारी केलेले ओळखपत्र, केंद्र किंवा राज्य सरकारचे स्मार्ट ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेने जारी केलेले छायाचित्र असलेले ओळखपत्र किंवा आधारकार्ड यांचा वापर केला जाऊ शकतो, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.