राज्यात कोरोना संसर्गात वाढ होत असून, दिवसेंदिवस नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत अधिकाधिक भर पडत आहे. मंगळवारी राज्यात विक्रमी 87 रुग्ण आढल्यानंतर बुधवारी त्याहून जास्त म्हणजे 97 नव्या रुग्णांची नोंद झाली. चोवीस तासांत 971 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात राज्यात नवीन 97 कोरोनाबाधित आढळून आले. तसेच त्यापैकी आणखीन 3 रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले. राज्यात चोवीस तासांत आणखीन 25 बाधित कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्येने साडेतीनशेचा टप्पा पार केला असून, ती 362 एवढी झाली आहे. कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण 9.9 टक्के एवढे आहे. राज्यात मंगळवारी नवीन 87 कोरोनाबाधित आढळून आले होते. तसेच, पाच बाधिताना इस्पितळात दाखल करण्यात आले होते.