कोरोनाचे चोवीस तासांत राज्यात ७१ नवे रुग्ण

0
10

कोरोनाचा संसर्ग झालेले नवे ७१ रुग्ण काल राज्यात सापडले. तर गेल्या २४ तासांत ११५ रुग्ण कोविडमुक्त झाले. तर सध्या राज्यात सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ही ९०१ एवढी अहे. तर गेल्या २४ तासांत कोविडमुळे एका रुग्णडाचा मृत्यू झाला आहे. राज्यात सलग चौथ्या दिवशी आणखी एका रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९८.१० एवढी आहे.