केंद्रीय पातळीवर गोव्याचे प्रश्‍न मांडणार ः फालेरो

0
13

तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेशानंतर मिळालेली राज्यसभेची उमेदवारी ही आपणासाठी निवृत्ती पॅकेज नव्हे, तर, या संधीचा योग्य वापर करून गोव्यातील विविध प्रश्‍न केंद्रीय पातळीवर मांडणार आहे. गोव्यातील समस्या गेल्या कित्येक वर्षात केंद्रीय पातळीवर योग्य पद्धतीने मांडण्यात आलेले नाहीत, असे प्रतिपादन तृणमूल कॉंग्रेसचे नेते तथा राज्यसभेचे उमेदवार लुईझीन फालेरो यांनी पत्रकार परिषदेत येथे काल केले.

पश्‍चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसच्या सरकारने गोव्याचे माजी मुख्यमंत्री, माजी आमदार लुईझीन फालेरो यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर फालेरो प्रथमच गोव्यात आले आहेत. गोव्यातील काही जणांकडून फालेरो यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने टीका केली जात आहे. त्या टीकेला उत्तर देताना फालेरो यांनी वरील वक्तव्य केले.

गोव्यात बेकारी, कोळसा प्रदूषण, म्हादई आदी प्रमुख समस्या आहेत. गोव्याची आर्थिक स्थिती चांगली नाही, हे सगळे प्रश्‍न केंद्रीय पातळीवर मांडण्याची संधी मला या निमित्ताने मिळणार असल्याचे यावेळी फालेरो यांनी सांगितले.