कुळे ते कॅसरलॉक दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम तूर्त बंद राहील, तर कुळे ते वास्को भागात रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू राहील, अशी माहिती पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुरगाव तालुक्यातील विविध भागांत रेल्वे मार्गामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी पाटो-पणजी येथे पर्यटन भवनामध्ये काल बैठक घेतली. या बैठकीला नीलेश काब्राल, आमदार दाजी साळकर, रेल्वेचे अधिकार्यांनी भाग घेतला.