कुर्टीत फ्लॅट फोडू दहा लाखांची चोरी

0
15

कुर्टी – फोंडा येथील न्यू हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील नरसिंह नाईक यांचा फ्लॅट फोडून काल सोमवारी सकाळी दहा लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी पळवले. केवळ दोन तासांच्या आत ही चोरी झाली. चोरीची घटना घडली त्यावेळेला फ्लॅटमध्ये कुणीच नव्हते.

नरसिंह नाईक हे कुर्टी पंचायत कार्यालयात जाण्यासाठी सकाळी दहा वाजता निघाले व १२च्या सुमारास परतले असता ही घटना उघड झाली. नाईक यांची पत्नी तसेच दोन्ही मुलगे कामानिमित घराबाहेर होते. लग्नसराईमुळे नाईक कुटुंबियांनी दागिने कपाटात ठेवले होते. याशिवाय नाईक यांच्या सासुरवाडीतील लोकांनीही आपले दागिने त्यांच्याकडे ठेवले होते. हे सगळेच दागिने चोरट्यांनी चोरले. फोंडा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत