गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीजवळील एका दुकानावर काल छापा घालून जुगार प्रकरणी पाच जणांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख 30100 रूपये आणि पाच लाख रूपयांचे जुगार साहित्य जप्त केली आहे. रोहित मंगल साहू, आशिफ खान, केविन रेबेलो, सानिफ कार्व्हालो, जोव्हिस ऑलिव्हेरा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यावेळी ऑनलाइन सट्टेबाजी सुरू होती. जप्त करण्यात आलेल्या साहित्यात दोन लॅपटॉप आणि एक संगणक आणि इतर साहित्याचा समावेश आहे.