किमान वेतनाबाबत १५ दिवसांत अधिसूचना

0
34

>> कामगारमंत्री मोन्सेरात यांची माहिती; मुख्यमंत्र्यांकडून मान्यता

कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्यासंबंधीची अधिसूचना येत्या १५ दिवसांत काढण्यात येणार असल्याची माहिती कामगारमंत्री बाबूश मोन्सरात यांनी काल दिली.

कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील मान्यता दिली आहे. आणि ही वाढ लागू करण्यासाठी येत्या १५ ते २० दिवसांत अधिसूचना काढण्यात येणार आहे, असे मोन्सेरात म्हणाले.

यासंबंधी निर्णय घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर आणखी एक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.

खासगी उद्योग आणि विविध सरकारी खात्यांसाठी रोजंगारीवर काम करणार्‍या कामगारांना या वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी बाबूश मोन्सेरात यांनी या वेतनवाढीसंबंधी बोलताना ही वाढ गणेश चतुर्थीच्या सणापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती; मात्र काल या वेतनवाढीसंबंधी खुलासा करताना त्यांनी ही वाढ येत्या १५ ते २० दिवसांनंतरच लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

राज्यातील कामगार संघटनांनी बर्‍याच काळापासून सातत्याने कामगारांच्या कमीत कमी वेतनात वाढ करण्याची मागणी सरकारकडे केली होती.