कार्निवल 18 फेब्रुवारीपासून, तर शिमगोत्सव 8 मार्चपासून

0
10

राज्यात 18 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीपर्यंत सरकारी पातळीवरील कार्निवल साजरा केला जाणार असून, 8 मार्चपासून शिमगोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती पर्यटन खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी काल दिली. राज्यातील सरकारी पातळीवरील कार्निवलला पणजी शहरातून येत्या 18 फेब्रुवारीपासून होणार आहे. मडगाव येथे 19 फेब्रुवारी, वास्को येथे 20 फेब्रुवारी आणि म्हापसा येथे 21 फेब्रुवारी रोजी कार्निवलह मिरवणूक काढण्यात येणार आहे. राज्यातील शिमगोत्सव मिरवणुकीला 8 मार्चपासून फोंडा शहरातून प्रारंभ केला जाणार आहे. पणजी येथे 11 मार्च रोजी शिमगोत्सव मिरवणूक होणार आहे. राज्यभरात 17 ठिकाणी शिमगोत्सव मिरवणूक होणार असून, रात्री 10 वाजल्यानंतर मिरवणूक काढण्यास मान्यता दिली जाणार नाही.