औषधनिर्मिती कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना ‘एस्मा’ लागू

0
6

राज्य सरकारने राज्यातील औषधनिर्मिती कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना एस्मा कायदा लागू केला आहे. औषधनिर्मिती उद्योगातील सेवा नागरिकांसाठी अत्यावश्यक असून, संपामुळे औषध निर्मितीमध्ये व्यत्यय आल्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. यासंबंधीचा आदेश गृहखात्याचे अवर सचिव विवेक नाईक यांनी जारी केला.