ओबीसी आरक्षण आव्हान याचिका; सुनावणी पूर्ण; अंतरिम निवाडा राखून

0
11

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ग्रामपंचायत निवडणुकांतील ओबीसी आरक्षणाला आव्हान देणार्‍या याचिकांवरील सुनावणी काल पूर्ण केली असून, अंतरिम निवाडा राखून ठेवला आहे.

पंचायत निवडणुकांतील ओबीसी आरक्षण जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या ट्रिपल टेस्टचे पालन करण्यात आलेले नाही, असा दावा याचिकादारांनी केला आहे.

सरकारतर्ङ्गे आव्हान याचिकांवर काल युक्तिवाद करण्यात आला. ओबीसी आरक्षण जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या ट्रिपल टेस्टचे पालन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. निवडणूक प्रक्रिया आता बंद करण्याचा आदेश दिल्यास निवडणूक कार्यक्रम वेळापत्रकानुसार पूर्ण होणार नाही, असा युक्तिवाद सरकारतर्ङ्गे करण्यात आला आहे.
चौथ्या दिवशी १२०९ अर्ज
राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी १२०९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.