31 C
Panjim
Saturday, March 6, 2021

एटीके मोहन बागानने हैदराबादला रोखले

बचाव फळीतील पश्चिम बंगालचा २७ वर्षीय खेळाडू प्रीतम कोटल याने नोंदविलेल्या इंज्युरी वेळेतील गोलाच्या जोरावर एटीके मोहन बागानने हैदराबाद एफसी संघाला २-२ असे बरोबरीत रोखत हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात सोमवारी वास्कोच्या टिळक मैदानावर झालेल्या सामन्यात प्रत्येकी १ गुण विभागून घेतला.

पाचव्याच मिनिटाला रेड कार्डमुळे एक खेळाडू कमी होऊनही हैदराबादने दोन वेळा आघाडी घेतली होती, पण भरपाई वेळेत त्यांचा निर्णायक विजय हुकला. हा निकाल त्यांच्या बाद फेरीच्या संधीसाठी प्रतिकूल ठरला.
वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. मध्यंतरास हैदराबादकडे एका गोलाची आघाडी होती. पाचव्याच मिनिटाला त्यांच्या चिंगलेनसाना सिंगला रेड कार्ड मिळाले. एक खेळाडू कमी होऊनही हैदराबादने त्यानंतर तीन मिनिटांत व सामन्याच्या आठव्याच मिनिटास खाते उघडले. आघाडी फळीतील स्पेनचा ३३ वर्षीय खेळाडू अरीडेन सँटाना याने हा गोल केला. मध्यंतरास हैदराबादने ही आघाडी राखली. दुसर्‍या सत्रात ५७व्या मिनिटाला एटीकेएमबीला आघाडी फळीतील पंजाबचा २५ वर्षीय मानवीर सिंग याने बरोबरी साधून दिली. हैदराबादला ७५व्या मिनिटाला मध्य फळीतील नेदरलँड्‌सचा ३० वर्षीय बदली खेळाडू रोलँड अल्बर्ग याने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हैदराबादने एक खेळाडू कमी असूनही जिद्दीने खेळ केला होता, पण भरपाई वेळेत गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याच्या ढिलाईमुळे हैदराबादला फटका बसला.

हैदराबादने १९ सामन्यांत दहावी बरोबरी साधली असून सहा विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे २८ गुण झाले. त्यांचा एकच सामना बाकी आहे. त्यांचे चौथे स्थान कायम राहिले असले तरी पाचव्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेड एफसी त्याना मागे टाकू शकलो. नॉर्थईस्टचे दोन सामने बाकी आहेत. १८ सामन्यांत २७ गुण अशी त्यांची कामगिरी आहे.

एटीकेएमबीने १९ सामन्यांत चौथ्या बरोबरीची नोंद केली असून १२ विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे ४० गुण झाले. त्यांनी मुंबई सिटीवरील आघाडी सहा गुणांनी वाढविली. मुंबई सिटीचे दोन सामने बाकी आहेत. १८ सामन्यांत ३४ गुण अशी मुंबईची कामगिरी आहे.

हैदराबादसाठी सामन्याचा प्रारंभ धक्कादायक ठरला. पाचव्याच मिनिटाला बचावपटू चिंगलेनसाना सिंग याला रेड कार्डमुळे मैदान सोडावे लागले. एटीकेएमबीचा मध्यरक्षक कार्ल मॅक्‌ह्युज याने चेंडूवर ताबा मिळविला. त्याच्या पासवर फॉर्मातील स्ट्रायकर रॉय कृष्णा याने हेडिंग केले. हैदराबादचा बचावपटू ओडेई ओनैन्डीया याने हेडिंगद्वारे चेंडू रोखला, पण त्याचा बचाव अचूक नव्हता. त्यामुळे एटीकेएमबीचा स्ट्रायकर डेव्हिड विल्यम्स याने चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी धावण्यास सुरवात केली. त्याने चिंगलेनसाना याला मागे टाकले. त्याचवेळी चिंगलेनसाना याने पाठीमागून ओढत त्याला पाडले. त्यामुळे रेफरी एल. अजितकुमार मैतेई यांनी चिंगलेनसानाला रेड कार्ड दाखविले.
यानंतरही हैदराबादने दडपण घेतले नाही. एटीकेएमबीचा बचावपटू प्रीतम कोटल याने हैदराबादचा चेंडू रोखला, पण तो गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याच्याकडे मारताना त्याने ढिलाई दाखविली. याचा फायदा उठवित हैदराबादचा मध्यरक्षक हालीचरण नर्झारी याला डावीकडे चेंडूवर ताबा मिळविला. त्यावेळी एटीकेएमबीचा बचावपटू टिरी हा सुद्धा गाफील होता. सँटानाच्या असित्वाची दखल त्याने घेतली नव्हती. हे त्याच्या लक्षात आले तेव्हा उशीर झाला होता. टिरी चेंडूपाशी जाण्याआधीच सँटानाने नेटच्या दिशेने फटका मारला. त्याने ताकदवान फटका मारला होता, पण चेंडू अरींदमच्या हाताला लागून त्याच्यामागे जाऊ लागला. त्याचवेळी एटीकेएमबीचा बचावपटू शुभाशिष बोस याच्या पायाला लागून चेंडू नेटमध्ये गेला.

एटीकेएमबीने दुसर्‍या सत्रात बरोबरी साधली. ५७व्या मिनिटाला हैदराबादच्या ओडेई ओनैन्डीया याचा हेडर मैदानाच्या मध्य भागी चुकला. त्यावेळी हैदराबादचा मध्यरक्षक लुईस सॅस्त्रे हा सुद्धा गाफील होता. त्यामुळे विल्यम्सने चेंडूवर ताबा मिळविला आणि मानवीरच्या साथीत चाल रचली. मानवीरने उजवीकडून मुसंडी मारली आणि शानदार फटक्यावर फिनिशींग केले. हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी गुडघ्यांत खाली वाकला, पण तो चेंडू रोखू शकला नाही. ७५व्या मिनिटाला हैदराबादचा बचावपटू आकाश मिश्रा याने थ्रो-ईनवर चेंडू फेकला. त्यावेळी गोलक्षेत्रालगत सँटानाने वेग आणि चपळाई दाखवित हेडिंग केले. त्यामुळे निर्माण झालेल्या संधीवर अल्बर्ग फिनिशींग केले. चेंडू नेटच्या उजव्या कोपर्‍यात गेला तेव्हा अरींदम काहीही करू शकला नाही. अल्बर्गला ७३व्या मिनिटाला आघाडी फळीतील लिस्टन कुलासो याच्याऐवजी मैदानावर उतरविण्यात आले होते. हैदराबादचे प्रशिक्षक मॅन्युएल मार्क्वेझ यांचा हा निर्णय अचूक ठरला, ज्याचे फळ संघाला दोन मिनिटांत मिळाले.
भरपाई वेळेत एटीकेएमबीला कॉर्नर मिळाला. डावीकडे बदली मध्यरक्षक जयेश राणे याने जवळच असलेल्या विल्यम्सकडे चेंडू सोपविला. विल्यम्सने पुन्हा दिलेल्या चेंडूवर राणेने क्रॉसशॉट मारला. त्यावेळी कट्टमनीला चेंडू नीट अडविता आला नाही. त्याचवेळी कोटलने हेडिंगवर लक्ष्य गाठले.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

आमोण्याची ज्ञानगंगा ः रामदास विद्यालय

डॉ. विठ्ठल ठाकूर त्या काळात पोर्तुगीज सरकारचे सर्व नियम सांभाळले जात असत. वर्षात सर्व परीक्षा योग्य ते परीक्षक...

शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य

चेतन कवळेकर(राज्यपुरस्कारप्राप्त शारीरिक शिक्षण शिक्षक) शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फक्त तंदुरुस्त शरीर एवढेच नव्हे, तर त्यात शारीरिक आणि भावनिक...

एक अगम्य चाहता… कधीच न भेटलेला!

ज. अ. रेडकर. मी माझ्या या अगम्य चाहत्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. परंतु आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेली व्यक्ती...

गूढ वाढले

जगातील आठव्या क्रमांकावरील आणि आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ ह्या सत्तावीस मजली आलिशान निवासस्थानापासून पाच - सहाशे मीटरवर...

सहा पालिकांसाठी ३२३ अर्ज वैध

>> पणजी मनपासाठी १०६ उमेदवार रिंगणात, आज स्पष्ट होणार अंतिम चित्र येत्या २० मार्च २०२१ रोजी राज्यात होणार्‍या पणजी...

ALSO IN THIS SECTION

सहा पालिकांसाठी ३२३ अर्ज वैध

>> पणजी मनपासाठी १०६ उमेदवार रिंगणात, आज स्पष्ट होणार अंतिम चित्र येत्या २० मार्च २०२१ रोजी राज्यात होणार्‍या पणजी...

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतरच निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा

>> गिरीश चोडणकर यांचे आयोगाला पत्र गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला लिहिलेल्या एका...

शुक्रवारी राज्यात ७९ कोरोना रुग्ण

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी १ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून नवीन ७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना...

सीझेडएमपीवर उद्या सुनावणी

राज्यात येत्या रविवार ७ मार्चला पणजी आणि मडगाव येथे किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावर (सीझेडएमपी) जनसुनावणी घेतली जाणार आहे. पणजी येथील जनसुनावणी कला...

महामंडळांनी स्वयंपूर्ण व्हावे ः मुख्यमंत्री

>> महामंडळांच्या आर्थिक स्थितीचा बैठकीत आढावा राज्य सरकारच्या महामंडळांना कर्ज कमी करून त्यांना स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नवीन उपक्रम...